नवी मुंबई दि.14: महाराष्ट्र शासनाच्या विकास वार्तांकनासाठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याकरीता दिला जाणारा २०१९ साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार कोंकण विभागातील दैनिक युथ सकाळचे संपादक संदीप काळे यांना तसेच शि. म. परांजपे पुरस्कार दै. लोकसत्ता रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.2019 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली होती.