ठाणे, दि. 6 : हलकी मालवाहू वाहनांची (3W/4W) फेसलेस स्वरूपात नोंदणी करण्याची सेवा दि.28 नोव्हेंबर 2024 पासून कार्यान्वित केली आहे. ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असून त्यासंबंधीची कार्यवाही www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे, अशी माहिती कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्तांनी हलकी मालवाहू वाहनांची (3W/4W) फेसलेस नोंदणी सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही सेवा पूर्णपणे फेसलेस स्वरूपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचे वाहन नोंदणी अर्ज करून वाहन नोंदणी शुल्क तसेच वाहन कराचा भरणा करता येणार आहे. हलके मालवाहू वाहनांची (3W/4W) या संवर्गातील वाहने परिवहन कार्यालयात सादर करण्याची आवश्यकता नसल्याबाबत दि.27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये कळविले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी कळविली आहे.