रत्नागिरी दि. ११ (सुनील नलावडे) संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावच्या तेरसे शिमगोत्सवातील होळीचा होम आज दुपारी १ वाजता लागला. या होलिकोत्सवासाठी मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांनी हजेरी लावली होती. ढोल ताशा व सनई च्या सुरांमध्ये श्रीदेवी तळेकरणीची रूप लावलेली पालखी सहानेवर बसलेली असताना समस्थ मानकर्यांनी गावकर्यांनी धुपाआरती झाल्यावर सहानेच्या बाहेर असलेल्या शिलारुपी देव मानाच्या स्थानावर प्रथम पूजा व नैवेद्य करून तेथील मानकरी भाविक यांनी वाजत गाजत जयघोष करीत होळीच्या माडाजवळ येऊन होळीच्या माडाचे पूजन करत लग्नातील मंगलाष्टके होऊन समस्त मानकर्यांनी ढोल ताशाच्या गजरात होम होणाऱ्या होळीला पूजा अर्चा करून पाच प्रदक्षिणा घातल्यावर होळीचा होम पेटवण्यात आला.
तळेकरीण देवीच्या होलिकोत्सवातील होळीला होम लागताच समस्त मानकरी, खोत यांनी होमात परंपरेणूसार नारळ अर्पण केल्यानंतर करजुवे पंचक्रोशीतील नव दाम्पत्यांनी होम मध्ये नारळ अर्पण केले. होळीच्या होमात नारळ अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्ये सहकुटुंब होळीच्या कुटावर उपस्थित होते. त्यांनतर श्रीदेवी तळेकरणीची पालखी मानकर्यांनी होमाभोवती पाच प्रदक्षिणा घालून, पालखी माहेरवाशिणींच्या नवसाच्या ओटी स्वीकारण्यासाठी सहानेवर विराजमान झाली व पालखी खेळवण्याचा महत्वपूर्ण उत्साह निर्माण करणारा खेळ रंगला.
तेरसे शिमगे व त्यांचे होम खाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये आज लागले होम लागल्यानंतर पालख्या गाव प्रदक्षिणा साठी सायंकाळी बाहेर पडल्या पुढे काही दिवस शिमगोत्सव रंगात जाणार असून तळकोकण शिमगोत्सवात रंगून जाणार आहे. थंड असलेल्या बाजापेठा समस्त गावकरी चाकरमानी यांच्या आगमनाने फुलल्या असून व्यापाराला तेजी अली आहे. एसटी, कोकण रेल्वे, खाजगी बस सेवा, लहान मोठी वाहने यांनी रस्ते वाहतूक जोरात असून रेल्वे सुद्धा चाकरमान्यांनी फुल्ल झाली आहे.

🛑’यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!