पनवेल दि.१३: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेमधे सर्व सामान्यांचे प्रश्न समजून घेतले त्याचा परिणाम दिसू लागला आहे. सर्व सामान्य नागरिकांना कळून चुकलं आहे की, लोकशाही वाचवायची असेल तर देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. कर्नाटक पासून याची सुरुवात झाली. कर्नाटकी जनतेने काँग्रेस पक्षाला बहुमत दिले. हाच परीवर्तन आगामी निवडणुकांत सुद्धा दिसून येईल. कर्नाटक तो झाँकी है दिल्ली अभी बाकी है. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वात उलवे काँग्रेस पक्ष कार्यालयात पेढे वाटून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.