पनवेल दि. ११: कवी, लेखक चारोळीकार अनिल दाभाडे यांच्या ” चांदण्या आणि मी…” या विक्रमी अशा चारोळी संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे हस्ते संपन्न झाले.
विक्रमी अशा चांदण्या आणि मी या चारोळी संग्रहात अनिल दाभाडे यांच्या एकूण तिनशे चारोळ्यांचा समावेश असून त्या भावनिक काल्पनिक व वास्तव आदी विषयावर लिहलेल्या आहेत. अहिल्यानगर येथील काव्यगंध प्रकाशन या संस्थेने हा भव्य चारोळी संग्रह छापला आहे.
प्रारंभी कवी अनिल दाभाडे यांनी आपल्या मनोगतात या चारोळी संग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्ये आपल्या मनोगतातून व्यक्त केले..
यानंतर माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या चारोळी संग्रहाचे मुखपृष्ठ बघून अतिशय भावनिक असे मनोगत व्यक्त करून अनिल दाभाडे यांना शुभेच्छा दिल्या आणि स्वतः या विक्रमी चारोळी संग्रहातील ५ चारोळ्या वाचून सादर केल्या व पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
अशा या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनाला पत्रकार व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा नवीन पनवेलचे अध्यक्ष गणेश कोळी, पत्रकार सुमंत नलावडे, साहित्यिक काशिनाथ जाधव उपस्थित होते.

![]()
