पनवेल दि.17: असं म्हणतात… जीवन खुप सुंदर आहे, पण ते जगत असतांना येणाऱ्या प्रसंगाना सकारात्मक दृष्टिने खंबीरपणे तोंड देणे हीच जीवनाची खरी वाटचाल आहे.
सकारात्मक विचारांची पेरणी करत मानवी मनावर आलेल्या ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दि.१६ रोजी, संध्या.५.०० वाजता श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल, ने “Coffee आणि बरंच काही… Season- 3” या कार्यक्रमात, कोविड-19 वर प्रतिबंधक उपाय व घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते डाॅ.निलेश कांबळे, टाटा हॉस्पिटल, मुंबई, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते, संचालिका संगिता विसपुते, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.सीमा कांबळे, सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते…
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सद्यस्थितीवर भाष्य करत विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर संगिता विसपुते यांनी सर्वांना या काळात अधिक सक्षम व सकारात्मक होण्यासाठी प्रोत्साहित केले, त्या नंतर चित्रफितीच्या माध्यमातुन कोविड-१९ संदर्भात जाणीवजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले टाटा हॉस्पिटलचे, हेल्थ फिजिशियन, मा.डाॅ.निलेश कांबळे सर, यांनी कोविड-१९ याविषयी बोलत असतांना कोरोना हा जास्तीत जास्त ड्रॉपलेट (Droplets) मधून पसरू शकतो, तसेच आपण मास्क लावणे, हात वारंवार हैंडवॉश ने धुणे, या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण केले.
आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांनी आपल्या मार्गदर्शनातून, काळ जरी कठीण असला तरी आपण त्यावर मात करू शकतो, या समस्येतूनच संधी निर्माण होतात, त्यामुळे खचून न जाता आपण याही काळात मार्गक्रमण केले पाहिजे असे सांगत सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती जाधव यांनी केले तर
डॉ.छाया शिरसाट यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!