नवी दिल्ली, दि. 25 : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देशातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, 286 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर 93 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!