रत्नागिरी दि.६ (सुनिल नलावडे) जिल्हा शासकीय रुग्णालयात गेली ३२ वर्ष निवृत्ती नंतरही पुढे आणखी ७ वर्षे वैद्यकीय सेवा बजावणारे प्रख्यात डॉक्टर दिलीप मोरे यांचा आज गुरवारी पहाटे कोविड आजाराशी झुंज देताना अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्यावर गेले १५ दिवस जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी व मुलगी यांना ही कोरोना बाधा झाल्याने त्यांच्यावर एकाचवेळी उपचार करण्यात येत होते.
जिल्हा रुग्णालयाचे अजात शत्रु डॉक्टर म्हणून त्यांचा नाव लौकीक होता त्यांना जनरल प्रॅक्टीसचे ज्ञान सर्वाधिक होते. रोगनिदान हा त्यांचा हातखंडा होता. औषध उपचाराच्या बाबतीत आजच्या घडीला त्यांचा हात कोणही धरू शकत नव्हता. कोणत्याही रुग्णांवर त्यांचे निदान लागू पडायचे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.ते त्यांनी जपले. डॉक्टरकी करताना त्यांनी सामाजिक बांधीलकी अतोनात जपली. जन सामान्यांचे आपले डॉक्टर म्हणून ते रत्नागिरी जिल्हा बरोबरच तळकोकणात प्रसिद्ध होते.
डॉक्टरी पेशाला महत्व देताना त्याला व्यवसायी व बाजारीपणा कधीही आणला नव्हता.”रूग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा” अशा प्रवृत्तीने ते समाजातल्या प्रत्येक घटका बरोबर मिळून मिसळून वागत होते. कोणी गोरगरीब असो अथवा श्रीमंतीचा थाट असणारा रूग्ण त्यांच्यावर उपचार सेवा करताना डॉक्टर सर्वांचे अशा पद्धतीने ते त्यांना तपासत असायचे. त्यांनी कधीही पैसे मागितले नव्हते अथवा भरमसाठ फी घेतली नव्हती.
खाजगी रुग्णालयात रुग्णाला हजारी रुपये मोजायला लागायचे मात्र इथे केवळ दोनशे रुपये एकदाच फि घेऊन नेहमी उपचार व्हायचे हेच डॉ.मोरे यांच्या सेवेचे वैशिष्ट्य. कष्टाळू गरिबांकडून वैद्यकीय शुल्क घेत नसायचे.
शासनाने आपल्याला दिलेले मानधन हीच आपली भाकरी ती पुरवून खाणे हेच त्यांनी आयुष्यभर धोरण राबवले.त्यांच्याकडे निष्णांतपणा होता परंतु खाजगी रुग्णालय काढले नाही अथवा मोठ्या रुग्णालयात सेवा बजावत पैसा केला नाही. मात्र कोणत्याही रुग्णालयाने उपचार निदानासाठी बोलावले किवा रुग्णांच्या नातेवाइकांनी बोलावले तर सर्व ते नियम पाळून फुकट निदान उपचार करत असायचे. त्यांना रत्नागिरीतील सर्व नामवंत हॉस्पीटलने त्यांचे स्वागतच केले हेच त्यांच्या वैद्यकीय सेवेतील कसब म्हणावे लागेल.
डॉ.मोरे तपच्छर्या व पुण्याई, आत्मबळ व आत्मविशवासावर प्रख्यात लोकप्रिय डॉक्टर झाले.त्यांच्या इतका लोकसंग्रह व मानमरातब जिल्हा शासकीय रुग्णालयात कोणाला प्राप्त झाला नाही. असेच म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्हा रुग्णालयात, पोलीस तुरुंगातील कैद्यांचे डॉक्टर, मनोरुग्णालयाचे डॉक्टर अशीही कामगिरी डॉ.मोरे यांनी बजावली पोलीस कुटुंबातील डॉक्टर म्हणून त्यांचा नाव लौकीक होता.
रत्नागिरीतील प्रख्यात उद्योगपती स्व.एम. डी. नाईक यांच्या सुपुत्राने रत्नागिरीत मच्छिमार वसाहत व सर्वसामन्यांसाठी एक रुग्णालय उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता. परंतु डॉ.मोरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय येथील गरज ध्यानी घेऊन जिल्हा रुग्णालयातच अखंड सेवा बजावली व अपेक्षित कार्य केले हे त्यांच्या सेवेतील एक प्रत्यय देणारे उदाहरण आहे.
सेवा भाव व निस्वार्थी सेवा यांचे प्रतीक म्हणजे डॉ.दिलीप मोरे म्हणावे लागेल. रत्नागिरीत डॉक्टर अनेकवेळा मिळत नाहीत अशी स्थितीत मात्र त्याची कसर डॉ.मोरेंनी भरून काढली. सरकारी रुग्णालयात अहोरात्र धावत जायचे.खाजगी उपचारही वेळ काढून करायचे मात्र डॉक्टरकीचा धंदा मात्र केला नाही ही त्यांची लोकप्रियतेची जमेची बाजू आहे.
कोरोना साथीच्या उपचाराच्या सुरवातीला जिल्हा रूग्णालयाने अभूतपूर्व कामगिरी केली. केवळ १५% डॉक्टर असतानाही कोरोनवर नियंत्रण आणयला यश मिळवल. कोरोना बधितांची टेस्ट घेण्याचे महत्त्वाचे काम दरदिवशी ९६ स्वॅब घेतले ते पुणे येथे तपासणीला पाठवले. तणावाखालील परिस्थितीत मात्र आमच्या डॉक्टरांनी काम केले.
दररोजची संख्या वाढल्याने पुणे कोल्हापूर मध्ये तपासणी अहवाल मिळण्यवर मर्यादा पडल्या तिकडून एवढ्या संख्येने चाचणी साठी पाठवूनही असे कळवल्या नंतर रुग्णांनवरती उपचाराला उशीर झाल्याने त्याचा फटका बसू लागला त्याही स्थिथित अपुऱ्या साधन सामुग्रीत टेक्निशियन कर्मचारी डॉक्टर्स च्या माध्यमातुन अखंडपणे उपचार करण्यात येयचे त्यामध्ये डॉ.दिलीप मोरे, डॉ.सुभाष चव्हाण, सर्जन डॉ. बोल्डे, डॉ.फुले मॅडम यांचा महत्वाचा वाटा आहे. कोरोना उपचार करणाऱ्या या सर्वांनाच सलग ७ दिवस रुग्णांवर उपचार केल्यास पुढे किमान ७ दिवस विलगी करण्यात राहावे लागते मात्र आम्हाला अपुऱ्या यंत्रणेमुळे विलगिकरणास राहण्यास मिळाले नाही याची खंत बाधित अहवाल येण्याच्या आदल्या दिवशी डॉ.दिलीप मोरे यांनी व्यक्त केली होती.
डॉ.दिलीप मोरे पूर्ण आरोग्य कर्मचारी आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावले असून अन्य सर्वजण ते काम मोठ्या निष्ठेने करत आहेत.
काही दिवसांपूर्वी डॉ.मोरे यांनी ४४ नवजात बालक व मतांवर कोरोना बाधित अहवाल आल्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचले होते. मात्र हे काम करत असताना त्यांना कोरोनची लागण झाली आणि आज त्यांचा बळी गेला. त्यांची पत्नी व मुलगी कोरोनाशी लढा देत आहेत. डॉ.मोरे यांचा अपुऱ्या साधन सामुग्री मुळे बळी गेल्याचे सांगण्यात येत.