दिल्लीतील संमेलनात महेंद्रशेठ घरत सहभागी
उलवे, ता. २५: नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी भागीदारी न्याय संमेलन आज आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात ओबीसींचे राष्ट्रीय नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत शिष्टमंडळासह सहभागी झाले.
यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. ओबीसी जनगणना करण्यासाठी माझ्याकडून वेळ झाली, परंतु ती चूक मी आता सुधारणार आहे. माझ्या बहिणीला विचारा की राहुलने एकदा काही ठरवले तर ते पूर्ण करतोच. आपले पंतप्रधान फक्त दिखाऊपणा करतात. प्रत्येकाने आपल्यातली शक्ती समजली तर सगळे शक्य आहे. तेलंगणामध्ये जी जनगणना झाली ती योग्य आहे, त्यामुळे तेथील संपूर्ण जातीनिहाय डेटा मिळू शकतो. हे संपूर्ण देशात लागू व्हायला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो यात्रेमुळे देशभर चांगल्या प्रकारे जनजागृती झाल्यामुळे गरिबातला गरीब आपल्या न्याय हक्कांसाठी जागा झाल्याचे चित्र या संमेलनात पाहायला मिळाले. देशातील दिवसेंदिवस वाढत असलेली ओबीसींची संख्या आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराला आजच्या भागीदारी न्याय संमेलनातून वाचा फोडण्यात आली. त्यामुळे येत्या काळात जातनिहाय जनगणना केंद्र सरकारला करावीच लागेल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी म्हणाले. दुर्लक्षित समाज जागा होत असल्याने काँग्रेससाठी हे आशादायक चित्र आहे. या संमेलनात देशभरातून हजारो ओबीसी कार्यकर्ते आणि शेकडो नेते उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लाखो कार्यकर्त्यांना ओबीसी भागीदारी न्याय संमेलनात मार्गदर्शन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र वाघेला, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री अशोक गेलहोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसींचे महाराष्ट्रातील नेते भानुदास माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

🛑पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा’🔹नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!