पनवेल दि.२५ (विजय पवार) : मागील विधानसभेच्या निवडणुकात मागील चार वेळा पनवेलचा गड निर्विवाद राखणारे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना यावेळी मंत्रिपद मिळावे अशी मागणी पनवेलकर करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी न लढलेले पनवेल मधील व्यावसायिक व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले रामशेठ ठाकूर यांनी दोनवेळा खासदारकिसाठी निवडणूक लढवून अंतूलेसारख्या दिग्गजानाही पळता भुई थोडी करून एकहाती विजय खेचून आणून इतिहास घडवला होता. शेतकरी कामगार पक्ष असो अथवा काँग्रेस पक्ष असो, जनतेच्या विकासाकडे पाठव फिरवण्याची भूमिका या पक्षांनी घेतली म्हणून रामशेठ यांनी अशा भूमिका न पटल्यामुळे पक्षांना रामराम केला आणि विकासाची कास धरणारा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून प्रशांत ठाकूर नावाचा सुशिक्षित आणि विकासाचा ध्यास असलेला एक हक्काचा आमदार भाजपला दिला. रामशेठ ठाकूर यांनी शेकापक्षात असताना शेतकरी कामगार पक्षाला उंचीवर नेऊन ठेवले होते. आज त्याच शेकापची वाताहत झालेली दिसते. पनवेलमध्ये काँग्रेसचे नामोनिशाण नव्हते तेंव्हा पनवेलच नव्हे तर सम्पूर्ण रायगड जिल्ह्यात काँग्रेसला उर्जीतावस्था आणली आणि प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने आमदार दिला. मात्र टोलनाक्याच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आडमुठे धोरणमुळे रामशेठ यांनी स्वाभिमान जपून प्रशांत ठाकूर यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपला मागील तीन टर्मचा हक्काचा आमदार मिळाला. यावर्षी पुन्हा विजयाचा चौकार मारून प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचे नेतृत्व सिद्ध केलं आहे. रामशेठ ठाकूर यांनी पनवेलमध्ये भाजपला सम्पूर्ण ताकतीने उभे केले. प्रशांत ठाकूर यांचा गावोगावीच्या मतदारांशी असलेला संपर्क आणि नेमक्या प्रश्नांची जाणीव व त्यांचे निराकारण करण्याची समज यामुळे पनवेल उरणमध्येय त्यांनी भाजपला ग्रामपंचायती मिळवून दिल्या. एवढेच नव्हे तर पनवेल महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
पनवेल शहराचे वाढते महत्व लक्षात घेऊन विकासाची अधीक विकासाची पायाभरणी करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांच्या सारख्या अभ्यासू आमदाराला मंत्रिपद देऊन ताकत दिल्यास त्यांना विकासाच्या पायघड्या पनवेलकर आणि भाजपसाठी मोलाचे ठरेल यात शंका नाही. आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पक्षबांधणी मजबूत केली आहे. लोकांच्या विश्वासाला ते पात्र ठरले आहेत म्हणूनच यावेळीही चौथ्यादा विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. पनवेलच्या विकासाच्या विचार करून त्यांना यावेळी मंत्रिपद मिळावे म्हणून पनवेलकर त्यासाठी प्रकर्षाने आग्रही आहेत.