पनवेल दि.४: पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी बुधवारी आज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. महापालिका सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे अर्ज स्वीकारण्यात आले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीकडून परेश ठाकूर, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर तसेच अॅड. प्रथमेश सोमण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
महाविकास आघाडीच्या वतीने प्रकाश म्हात्रे, तर शिवसेना (उबाठा) गटाकडून नितीन गावंड यांनी अर्ज सादर केला.

![]()
