पनवेल दि.१९: विविध उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पनवेल महानगर प्रेस क्लब च्या माध्यमातून केले जाते.त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने पनवेल रेल्वे स्थानका जवळील गणेश कृष्ठरुग्ण वसाहतीमधील बांधवांबरोबर पत्रकारांनी दिवाळी साजरी करून फराळ वाटप करण्यात आले.
या वेळी डॉ. उषा राठोड, शहर क्षयरोग व कुष्ठ रोग अधिकारी, पनवेल महानगरपालिका, मा. नगरसेवक ॲड. प्रकाश बिनेदार, पनवेल महानगर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे ,संघटनेचे संजय कदम, सुमंत नलावडे, सरचिटणीस राकेश पितळे, सदस्य संदीप बोडके, लालचंद यादव,गणेश कुष्ठररोग वसाहत सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक आंबेकर,श्याम साळवी,सदस्य, भाजपा जिल्हा कार्यकारिणी, रायगड, अमोल जाधव,अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहर मंडल, ॲड शिवकुमार कांबळे, संतोष म्हस्के, प्रकाश सोनवळे, सुमित सकपाळ,आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. दीपावली हि गोर गरीब तसेच समाजातील सर्वच थरांतील लहान मोठ्यानं साठी आनंदाचा सण . समाजातील प्रत्येक घटक हा दिवाळी सण आपआपल्या परीने साजरा करत असतो .पण समाजातील काही दुर्लक्षित घटक आर्थिक परिस्थिती मुळे या सणाचा आनंद उपभोगू शकता नसल्यानी समाजातील काही संवेदनशील व्यक्ती अश्या समाजातील दुर्लक्षित लहान मोठ्या व्यक्तींसाठी काहीतरी नेहमी सतत सामाजिक कार्य करत असतात .त्याचाच एक भाग म्हणून वर्षभर पनवेल महानगर प्रेस क्लब सामाजिक कार्य करत असतो. समाजाने आणि नातेवाईकांनी नाकारलेले हे काही कृष्ठरुग्ण आजही भीक मागून आपल्या पोटाची खळगी भरत आहेत. तर इतर जण छोटी¬मोठी कामे करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या वसाहतीसाठी पनवेल पालिकेने वीज, पाणी या प्राथमिक सुविधा दिलेल्या आहेत. तसेच दारिद्ररेषेखाली सर्व कुटुंबांचा समावेश केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्वस्त धान्य दुकानाचा लाभ मिळत असून कसाबसा जीवनाचा रेटा पुढे नेत आहेत. यांच्या जीवनात आम्ही सुद्धा समाजाचा एक अंग आहोत याची जाणीव होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन केलेअसल्याचे पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी सांगितले.


![]()
