पनवेल, दि.21(संजय कदम) पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने पहाटे श्रींची काकड आरती, नित्य नैमित्यिक पुजा प्रसाद, लघु रुद्र पुजा, श्रींची आरती व प्रसाद, श्री दत्त गायत्री होम हवन, सद्गुरु पाद्य पुजा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महिला मंडळाचे भजन तसेच प.पू.गुरुवर्य सुधाकर (भाऊ) घरत यांचे प्रवचन, सायंकाळी श्रींची महाआरती, महाप्रसाद, गुरुमंत्र प्रदान कार्यक्रम व श्री स्वामी समर्थ मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे येणार्या स्वामी भक्तांसाठी व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आगरी समाज हॉल पनवेल येथे करण्यात आली होती. हा सोहळा निमंत्रक प.पु.सुधाकर (भाऊ) घरत व अवधूत सुधाकर घरत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.