पनवेल दि.२६ (संजय कदम) : सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवत पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला अटक केली.
करंजाडे से. ५ पोलीस चौकी समोर जाणाऱ्या रोडला एक ४७ वर्षाच्या पुरुषाचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची माहिती फोनद्वारे पोलीस हवालदार माधव शेवाळे यांना बातमीदाराने दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस हवालदार माधव शेवाळे यांनी बातमी वरिष्ठांना दिली. दरम्यान दिवसपाळी कर्तव्या करिता असलेले पनवेल शहर पोलीस ठाणे बिट मार्शलचे पोहवा विलास कारंडे व पोहवा राजेंद्र केणी यांनी घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपी नागेश काळे (वय ३२) हा पळून जाण्याच्या बेतात असताना ताब्यात घेतले. मयताचे त्याच्या चुलत भावाचे पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचे कारणावरुन आरोपी नागेश वाल्या काळे याने त्याचा मयत भाऊ दत्तु वाल्या काळे, वय ४५ वर्षे याचे डोक्यात दगड घालुन त्याची हत्या केली. आरोपी नागेश काळे याचे विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.