पनवेल दि.२८ (संजय कदम): महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी शहरातून १ पिस्टल सह ६ जिवंत काडतुसे जप्त करून एकाला अटक केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराच्या आधारे पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात साफळा लावून एक इसमास पिस्टल व 6 जिवंत काडतुसाह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. अनंथ (वय-३६ रा सानपाडा) असे या इसमाचे नाव असून त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्ग्दर्शनाखाली सपोनी सचिन पोवार, सपोनि सुनील वाघ, पोउपनि किरण राउत, पोहवा प्रवीण पवार, पोना भोसले, पोशि काकडे, पोशि कराड, पोशि लोखंडे यांनी केली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!