पनवेल दि.२७: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करत असतांना स्थानिक कामगारांना न्याय देण्यास अग्रेसर असणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचा कामाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे काम सातत्याने सुरु आहे, मग ती पगारवाढ असो किंवा सामाजिक सुविधा. दरवर्षी 14 ते 15 पगारवाढीचे करार संघटनेच्या माध्यमातून केले जातात. यावर्षीचा हा आठवा करार में. शेरॉन बायो मेडिसिन तळोजा या कंपनीतील कामगारांसाठी तब्बल अकरा हजार रुपये पगारवाढीचा करार नुकताच करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना एक बेसिक पगार बोनस, 3 लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी तसेच 10 लाख रुपयांची बफर पॉलिसी, पर्सनल लोन 50,000 रुपये, लंच अलाऊन्स 100 वरून 150 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.
या करारनाम्यावेळी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष – पि.के रमण, सरचिटणीस -वैभव पाटील तर मॅनेजमेंट तर्फे डि. पी. पालव (CEO), संदीप ओझा (प्लॅन्ट हेड), परीक्षित पालन (मार्केट हेड), माया शर्मा (HR हेड), कायदेशीर सल्लागार – आसिफ मुल्ला, सईद मुल्ला तसेच कामगार प्रतिनिधी रोहन कोळी, महेंद्र ढोंगरे, अनिल ढोंगरे, विद्यानंद पाटील, आकाश फडके, महेश लघु पाटील, संतोष मुंडे, महेश दशरथ पाटील आदी उपस्थित होते. पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कामगारांनी संघटनेचे आभार मानले.