पनवेल दि.१७: पेण येथील लॅबगार्ड कंपनीतील कामगारांसाठी न्यू मेरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटने मार्फत हा ३ रा पगारवाढीचा करार करण्यात आला. नुकताच संघटनेच्या पनवेल कार्यालयात हा करार करण्यात आला.
या करारनाम्यानुसार कामगारांना १०,००० रुपये पगारवाढ, १२.५% बोनस, मेडीक्लेम, पिकनिक, रजांमधे वाढ करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारनाम्यानुसार पगारवाढीच्या फरकाची रक्कम कामगारांना दिपावली सणापूर्वी अदा करण्यात येणार आहे त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. या करारनाम्या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के.रमण, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर अजय कणेकर, प्रोडक्शन मॅनेजर राहुल जोगत तसेच कामगार प्रतिनिधी हरेश पाटील, सुरेश दळवी, प्रमोद पाटील, रोहन कडव, प्रदिप धनावडे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. दिपावलीच्या पूर्वसंधेला झालेल्या पगारवाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!