ठाणे दि.१६: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या लढ्याला आता मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
या भेटीदरम्यान येत्या २२ तारखेला होणाऱ्या भूमिपुत्रांच्या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असून, हा लढा न्यायाचा आणि हक्कांचा असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या संपूर्ण आंदोलनाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहील.
२२ तारखेला होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, आपल्या हक्कासाठी एकजुटीने आवाज बुलंद करण्याचे आवाहन मी सर्व भूमिपुत्र बांधवांना करीत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!