उलवे, ता. १३ : “देशाच्या राजकारणात आदराने नावे घ्यावीत अशा मोजक्या नामवंतांमध्ये दिबांचे कार्य आणि आदर्श आहे. ओबीसी, मंडल आयोगाचे अग्रणी तेच आहेत आणि १९८४ च्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या गौरवशाली, शौरशाली, ऐतिहासिक लढ्याचे नेतृत्व त्यांनीच केलेले आहे. त्या ऐतिहासिक आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. तरीही सरकार अद्यापही विमानतळाला नाव देत नाही, ही शोकांतिका आहे. आज दिबांची शंभरावी जयंती, त्यामुळे हे औचित्य साधून सरकारने तातडीने दिबांचे नाव विमानतळाला द्यावे. सरकारने विमानतळाला दिबांचे नाव दिले तर तीच खरी दि. बा. पाटील साहेबांना श्रद्धांजली ठरेल,”
असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत जासई येथे अभिवादन करताना म्हणाले. यावेळी जासई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!