पनवेल दि.७: आज कळंबोलीमध्ये अनेक समस्या आहेत,गेले अनेक वर्ष त्या सुटल्याच नाहीत,त्यामुळे नागरिकांना अर्थात मतदारांना बदल हवा आहे म्हणून माझी उमेदवारी हा माझा आवाज नाही तर जनतेचा आवाज असल्याचे पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक ८ ड चे अपक्ष उमेदवार रोहन आत्माराम पाटील यांनी बोलताना सांगितले.
कळंबोलीमध्ये अनेक समस्या आहेत, त्यामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. कचऱ्याची व्यवस्था नाही.स्वच्छता अभियानाकडे कोणीच लक्ष देत नाही. सत्ताधाऱ्यांनी कळंबोलीच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. कळंबोलीमध्ये मोठ-मोठ्या सोसायटी आहेत पण त्या सोसायट्यांमधील कचरा उचलला जात नाही, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. या अशा अनेक कारणांमुळे मतदारांना आता बदल हवा आहे असे रोहन आत्माराम पाटील यांनी सांगून माझे वडील अर्थात ज्येष्ठ समाजसेवक आत्माराम पाटील हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गाने आम्ही वाटचाल करत असून या निवडणुकीत निश्चितच माझा विजय होईल असा आशावाद रोहन आत्माराम पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.
![]()
