पनवेल दि.22: कोरोना वैश्विक महामारीच्या या काळात नागरिकांना सातत्याने सर्वोतपरी मदत करणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किटसाठी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत गोर गरीब गरजू सर्वसामान्य नागरिकांना मदत दिली आहे. सध्याच्या कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीतही त्यांनी लाखो लोकांना कोरडा अन्नधान्य, तयार भोजन, मास्क, रोगप्रतिकारक गोळी, सॅनिटायझर असे आवश्यक साहित्य दिले. त्याचबरोबरीने कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावे, यासाठी स्वतः आणि सहकाऱ्यांच्या मार्फत पाठपुरावा मदतकार्य सुरु आहे.
सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाकरीता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी ” कोविड १९” संदर्भात वेद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीबाबत त्यांच्या आमदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी एकवेळची विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यास शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून त्यानुसार कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५० लाख रुपयांचा आमदार निधी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचाराकरिता पीपीई किट खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!