पनवेल दि.२८: महापूर आणि दरड या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी भाजपच्यावतीने महाडकरांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. त्या अंतर्गत दररोज ६ हजार महाडकर नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून बिस्किटे, व पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक व्यवस्था केली जात आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यावर भोजन तयार करण्याची जबाबदारी सांभाळत असून त्यांची टीम तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, नाना महाले, बिपीन म्हामुणकर महाडमध्ये ठाण मांडून असून ते व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते गरजूंना भोजन, पाणी व इतर मदत पोहोचवत आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!