पनवेल दि.३०: आम्ही काम करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे जो शब्द तुम्हाला देणार तो पुर्ण करून पुन्हा तुमच्या समोर येऊ अशी ग्वाही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. तसेच आरोप अनेक जण करु शकतात मात्र जनतेची काम करण्याची धमक लागते ती धमक महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन केले. खारघर मध्ये झालेल्या प्रचार रॅलीवेळी ते बोलत होते. तसेच येत्या २० तारखेला कमळा समोरील बटन दाबून विकासाच्या दिशेने पाऊल उचलून पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांना केले.
पनवेल मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. प्रचारा दरम्यान मतदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता विजयाचे चित्र आत्ताच स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांची भव्य प्रचार रॅली निघाली. खारघर गावातील चेरोबा मंदिरात दर्शन घेऊन खारघर शहरात प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर सेक्टर १२ मधील ब्लॉक, ए ते एफ ब्लॉक आणि शेवटी शिवमंदिर असा प्रचार करण्यात आला.
यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, निलेश बावीस्कर, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, आरपीआयचे पनवेल महानगर अध्यक्ष प्रभाकर कांबळे, कीर्ती नवघरे, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, अल्पसंख्यांक समाजाचे नेते मन्सूर पटेल, जिल्हा महिला सरचिटणीस संध्या शारबिद्रे, महिला मोर्चा खारघर शहर अध्यक्षा साधना पवार, शिवसेना अध्यक्ष प्रसाद परब, चंचला बनकर, आरपीआय अध्यक्ष खारघर मल्हारी घाटविसावे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💥पोटे मसाले तर्फे दिवाळीच्या शुभेच्छा

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!