3D स्क्रीन जिथे कोणत्याही 3D चष्म्याशिवाय दृश्यांचा आनंद घेऊ शकता
नवी मुंबई, 5: भारतातील पहिली सूचिबद्ध रिटेल आरईआयटी असलेल्या नेक्सस सिलेक्ट ट्रस्टच्या नेक्सस सीवूड्स या प्रीमिअर प्रॉपर्टीमध्ये आयाम या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्युबॉइड ॲनामॉर्फिक स्क्रीन अनावरण करण्यात आले.
आयाम म्हणजे मिति, आणि नेक्सस सीवूड आणि एसअँडओ इन्व्हेस्टमेंट इन-मॉल ॲडव्हर्टायझिंगची मिति बदलण्यास सज्ज झाले आहेत. अशा प्रकारची अत्याधुनिक थ्रीडी स्क्रीन असलेला हा महाराष्ट्रातील पहिला मॉल ठरला आहे आणि ग्राहकांवर कायमस्वरुपी ठसा उमटिवणारा इमर्सिव्ह, खिळवून ठेवणारा कंटेन्ट तयार करण्यासाठी ब्रँड्सना अतुलनीय संधी लाभली आहे.
आयाम स्क्रीन ही मॉलच्या सेंट्रल ॲट्रिअम या मध्यवर्ती ठिकाणी असून या स्क्रीनमुळे 360 अंशांचा डिस्टॉर्शन-फ्री व्हिज्युअल अनुभव मिळतो. 15 फुट रुंद व 9 फुट उंच क्युबॉइडमुळे ॲडव्हर्टायझिंग एका नव्या उंचीवर पोहोचेल. या माध्यमातून ब्रँड्सना त्यांची उत्पादने लाँच करण्यासाठी, प्रमोशनसाठी, इंटरॅक्टिव्ह कॅम्पेनसाठी आकर्षक व सखोल ब्रँड रिकॉल देणारे शक्तिशाली साधन उपलब्ध झाले आहे. जमिनीपासून अनेक फुटांवर हा क्युबॉइड बसविलेला असून तो चारही बाजूंनी पाहता येऊ शकतो. आयाम स्थिर राहील याची अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून पूर्ण काळजी घेण्यात आली आहे आणि खरेदीदार व ब्रँड पार्टनरसाठी स्तिमित करणारा अनुभव निर्माण करण्याच्या दृष्टीने आयाम डिझाइन करण्यात आला आहे.
नेक्सस सिलेक्ट मॉल्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर निशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, “नेक्ससमध्ये आम्ही रिटेल अनुभवांमध्ये इनोव्हेशन सादर करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आयाम हे कथाकथनाच्या भविष्याचे प्रतिनीधित्व करते. एक अविस्मरणीय व वैशिष्ट्यपूर्ण मार्गाने आपल्या ऑडियन्ससोबत संवाद साधण्यास व्यवसायांना आयाम सक्षम करते. अत्याधुनिक तंत्रज्ञान व कल्पक शक्यता यांची सांगड घालून आम्ही रिटेलमध्ये एक नवा मापदंड निश्चित करत आहोत आणि ब्रँड्स त्यांच्या टारगेट कन्झ्युमर्सवर उत्कृष्ट छाप सोडते.”
या डायनामिक ॲनामॉर्फिक स्क्रीनमुळे ब्रँड्सना नवी मुंबईतील वाढत्या व वैविध्यपूर्ण लोकसंख्येशी जोडून घेण्यासाठी इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. आयाममुळे ब्रँड्सना लक्ष वेधून घेण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे आणि त्यांचा संदेश अत्यंत इनोव्हेटिव्ह फॉरमॅटमध्ये देऊ शकतात, जेणेकरून त्यांचे अस्तित्व आजच्या टेक-सॅव्ही व अनुभव घेण्यास इच्छुक असलेल्या खरेदीदारांशी सुसंगत असेल.
एसअँडओ इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक संज्योत वैद्य म्हणाले, “आयाम या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्युबॉइडच्या लाँचच्या निमित्ताने नेक्स सीवूड्ससोबत भागीदारी करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. मॉल-ॲडव्हर्टायझिंगच्या जगात हे सहयोग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयाममुळे ॲडव्हर्टायझिंगच्या
अनुभवात अमूलाग्र बदल घडून येईल, अशी इनोव्हेटिव्ह आउट-ऑफ-होम उपाययोजना तयार करण्यासाठी समर्पित आमच्या स्पेशलाइझ्ड मॉल डिव्हिजनला खात्री आहे. यामुळे ब्रँड्सना सतत बदलणाऱ्या ग्राहकांशी अनोख्या व भविष्यवेधी पद्धतीने संवाद साधण्याची अतुलनीय संधी मिळेल.”
हे ग्राउंडब्रेकिंग मानक निश्चित करून नेक्स सीवूड मॉलने रिटेल वातावरणात सुधारणा केली आहे, त्याचसोबत ब्रँडना ग्राहकांशी जोडून देण्याच्या पद्धतीत अमूलाग्र बदल घडवला आहे. त्यामुळे रिटेल ॲडव्हर्टायझिंग इनोव्हेशनमध्ये त्यांनी जागतिक पातळीवरील लीडर म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. या गेमचेंजिंग व्हिज्युअल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येक ब्रँडचा अनुभव अधिक समृद्ध होतो आणि या वेगाने बदलणाऱ्या मार्केटमध्ये व्यवसायांना उठून दिसण्यासाठी मदत होते.