पनवेल दि.२१: दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी साहेब यांना तब्बल 25 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. जिल्हाध्यक्ष यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यासाठी ओबीसी सेलच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकी प्रसंगी ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंग यादव, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते तर खासदार राहुल गांधी यांचे सल्ला गार के. आर. राजू व प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या उपस्थितीत महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वांनी महेंद्रशेठ घरत यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. यावेळी ओबीसी विभागाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!