पनवेल दि.१२: महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून नवीन पनवेल येथील ॲडव्होकेट तथा पब्लिक नोटरी वकील नागेश अरविंद हिरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद सिकंदर अली, असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. यशवंतराव खराडे तसेच सचिव ॲड. प्रवीण नलावडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र ॲड. नागेश हिरवे यांना देण्यात आले आहे.
ॲड. नागेश हिरवे हे रायगड जिल्ह्यात २०१२ पासून वकिली व्यवसाय करीत आहे. तसेच ते विधी सेवा समिती, पनवेल च्या पॅनलवर कार्यरत असून अनेक गरीब आणि गरजू लोकांना मोफत न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आहे. तसेच पर्यावरण क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आजही चालू आहे.
नुकतीच केंद्र सरकारतर्फे संपूर्ण भारतात मोठ्या संख्येने नवीन नोटरी वकिलांची नियुक्ती झाली आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच नवनियुक्त नोटरी वकिलांना त्यांचे नोटरी लायसन मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. या तांत्रिक अडचणी सोडवून संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच नवनियुक्त नोटरी वकिलांना नोटरी लायसन मिळवून देण्यासाठी ॲड. नागेश हिरवे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेत महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन तर्फे त्यांची रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भविष्यात जुन्या व नवीन नोटरी बांधवांना नोटरी सेवा देताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच या क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न, समस्या महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत मांडून त्या मार्गी लावण्याचे काम करणार असल्याचे ॲड. नागेश हिरवे यांनी सांगितले.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ साहेब यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
![]()
