ठाणे दि.०२: येत्या रविवारी ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. रविवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल.रात्री ११-०० ते १२-२३ संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री १२-२३ वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल. हे खग्रास चंद्रग्रहण सर्वांना साध्या डोळ्यांनी पाहता येईल.
हे खग्रास चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, आफ्रिका, यूरोप,आस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथून दिसेल. यापुढील चंद्रग्रहण मंगळवार ३ मार्च २०२६ रोजी होईल असेही दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

🛑Thakur Infraprojects Pvt Ltd:🔸कर्मचाऱ्यांच्या दहावी, बारावी परीक्षेत यश संपादीत केलेल्या पाल्यांचा सत्कार

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!