पनवेल दि.२१: कामोठे वसाहतीतील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा या निवासी इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेत माय लेकीचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र नंतर आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याचं नागरिकांनी सांगितलं. यात फ्लॅटमध्ये असलेल्या रेखा शिसोदिया व पायल शिसोदिया यांचा दुर्दैवी मृत्यू झालाआहे. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग सिलेंडर स्फोटामुळे आणखी भीषण बनली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!