डोळ्यावरील काळीपट्टी हटवली
हातात तलवार नव्हे तर संविधान
नवी दिल्लीदि. १७: भारतातील कोणत्याही न्यायालयात न्यायदेवतेची मूर्ती दिसते. न्यायदेवतेच्या हातात तराजू, तलवार असते आणि त्याच बरोबर तिच्या डोळ्यांवरपट्टी दिसते. भारतीय न्यायालयाने आता ब्रिटिश काळातील परंपरा मागे टाकून नवी पद्धत स्विकारण्यास सुरुवात केली आहे. काही दिवासांपूर्वी ब्रिटिश कायद्यांमध्ये बदल करण्यात आले होते. मूर्तीच्या डोळ्यांची पट्टी काढून हातात तलवारीच्या जागी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासंदर्भातील बदलांसाठी पुढाकार घेतला होता. आता त्यांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयात पुतळा बसवण्यात आला आहे.
🔸’आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे’
🔹पंतप्रधानांचा महाराष्ट्राच्या जनतेशी मराठीतून संवाद