पनवेल दि.७: पनवेल महानगर प्रेस क्लब आणि सुतिका गृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त लाईफस्टाईल डिसऑर्डर कॅम्प व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानपरिषदेचे आ.विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आ.विक्रांत पाटील, शेकाप नेते काशिनाथ पाटील, उद्योजक विजय लोखंडे, नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे, पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे उपस्थित होते.
यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. पनवेलमधील अनेक वर्षे पत्रकारितेत भरीव योगदान देणार्‍या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, सुनील पोतदार, प्रमोद वालेकर, देवदास मटाले, गणेश कोळी, विजय पवार, संजय कदम, सुमंत नलावडे, अरविंद पोतदार, तृप्ती पालकर, वर्षा कुलकर्णी यांना शाल व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
यावेळी सुतिका गृह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील चार हजार नॉर्मल डिलेव्हरी करणार्‍या डॉ.सुजाता गायकवाड यांचा विशेष सत्कार आ.विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या विशेष सहकार्यासाठी डॉ.अंजली लामतुरे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आ.विक्रांत पाटील यांनी सांगितले की, पनवेलच्या विकासासाठीचे अनेक प्रश्‍न सभागृहात मांडून ते सोडविण्याचे प्रामाणिक काम आतापर्यंत करत आलो आहे. त्याचप्रमाणे पत्रकारितेशी निगडीत कोणतेही प्रश्‍न किंवा मुद्दे असल्यास त्याचा सरकार दरबारी पाठपुरावा करून ते सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे त्यांनी आश्‍वासित केले.
पत्रकार दिनाच्या या कार्यक्रमावेळी पनवेल महानगर प्रेस क्लबच्या कार्यकारिणी आणि पदाधिकार्‍यांचा देखील सन्मान करण्यात आला. यामध्ये पत्रकार अनिल भोळे, राकेश पितळे, दत्तात्रेय कुलकर्णी, स्वप्नील दुधारे, राजेंद्र पाटील, प्रतिक वेदपाठक, लालचंद यादव, संदीप बोडके, सचिन भोळे यांचा सन्मान करण्यात आला.
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी पनवेलमधील अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यामध्ये भालचंद्र जुमलेदार, दिपक घोसाळकर, रत्नाकर पाटील, वैभव गायकर, कुणाल लोंढे, मयुर तांबडे, अरुणकुमार मेहेत्रे, गणपत वारगडा, सुनील वारगडा, राजू गाडे, सुभाष वाघपंजे या देखील पत्रकारांचा पनवेल महानगर प्रेस क्लबच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे दिमखादार सुत्रसंचालन कवि, लेखक, अभिनेते व ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश कोळी यांनी केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!