पनवेल दि.२५ : द इंटरनॅशनल फिटनेस अँन्ड बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेलच्या ऋषिकेश राजेंद्र पेणकर यांनी सुवर्ण पदकासह आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावला.
इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडीबिल्डिंग फेडरेशन ही बॉडीबिल्डिंग आणि फिटनेससाठी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्रीडा प्रशासकीय संस्था आहे. जागतिक आणि कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप, अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते. आयएफबीबी अर्थात द इंटरनॅशनल फिटनेस अँन्ड बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने दिनांक २० ते २२ सप्टेंबर पर्यंत शरीरसौष्ठव स्पर्धा गोरेगाव येथील नेस्को एक्सिबिशन सेंटर येथे पार पडली. देशभरातील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ऋषिकेश पेणकर यांनी पुरुष गटातील फिजिक विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी केलेल्या सरस कामगिरीमुळे सुवर्ण पदकासह मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावत मेन्स फिजिक ओव्हर ऑल आयएफबीबी प्रो कार्ड प्राप्त करण्याचा बहुमान मिळविला. त्यांनी केलेल्या चमकदारीमुळे पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, त्याबद्दल पनवेल महानरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, शहर सरचिटणीस अमित ओझे, प्रितम म्हात्रे, केदार भगत, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव यांनी अभिनंदन केले.

केविन डायस – जल रंग चित्रकार (Watercolor painter)

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!