देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान तुम्ही डिजीटल माध्यमातून देखील साजरी करु शकता. 31 जुलै रोजी प्रसारीत झालेल्या मन की बात या कार्यक्रमात खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संबंधी माहिती दिली होती. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वतच्या सोशल मिडीया प्लॉटफॉर्मचा प्रोफाईल पिक्चर बदलून या 13 दिवसाच्या कालवधीत तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाप्रमाणे मोदींनी त्यांच्या सोशल मिडियाचा प्रोफाईल पिक्चर बदलून तिरंगा ठेवण्यात आला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील स्वत:च्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा ठेवला आहे.
15 ऑगस्ट 2022 ला भारत स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण होतील. म्हणून यावर्षीचा स्वातंत्र्यदिवस भारतासाठी खास आहे. हे संपूर्ण वर्ष आपण स्वातंत्र्याचा मृत महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.