पनवेल दि. 20:पनवेल महापालिकेची महासभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आज ऑनलाइन झाली. या सभेत कळंबोली येथील सेक्टर 6 ई प्लॉट क्रमांक 2 मध्ये आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून उभारण्यात येणार्‍या उद्यानाला मंजुरी देण्यात आली. सेक्टर 11मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय सभागृह बांधण्यात येणार असल्याने कळंबोली परिसरातील नागरिकांना चांगले उद्यान आणि सभागृह उपलब्ध होणार आहे. पनवेल शहरात लेंडाळे तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या जुई गावात मलनि:सारण वाहिनी टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे व मलप्रक्रिया केंद्र उभारणे यासाठी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने या गावाला पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडत असतात. महावितरणने टपाल नाका येथे 2019 मध्ये नवीन उपकेंद्र उभारले आहे. त्या ठिकाणाहून नागपूरच्या धर्तीवर महावितरणने  3900 मीटर भूमिगत केबल टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पनवेल शहरात तसेच ग्रामीण भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्याने व गंजल्याने त्या अपुर्‍या पडत असल्याने यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे व अस्तित्वात नसलेल्या ठिकाणी जलवाहिन्या टाकणे आणि त्या अनुषंगाने  येणारी कामे तातडीने करून घेण्यासाठी ठेकेदार नेमण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली.
या सभेला सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती  संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त सांडभोर उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!