लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणखी एक उपक्रम 
पनवेल दि.19: गोरगरिबांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल ६० हजार कुटुंबांना गणपती सण गोड करण्यासाठी अन्नधान्य दिला जाणार आहे.

संपूर्ण जग ‘कोविड १९’ या आजाराशी लढा देत आहे. भारतामध्ये सुद्धा या विषाणूच्या प्रादुर्भावाने हजारो लोक मृत्यूमुखी पडले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव महामारी आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे जगभरात अर्थव्यवस्था बिकट झाली. या परिस्थितीत गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने ‘मोदी भोजन’ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या १ लाख २५ हजारहून नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर ९० हजारहून अधिक नागरिकांना तांदुळ, गोडेतेल, तुरडाळ, कांदे, बटाटे, साखर आदी अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकटकाळात आधार देण्यात आलेला. तसेच १ लाखाहून अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या, सॅनिटायझर अशा अनेक आवश्यक साहित्य देण्यात आले.  त्याचबरोबरीने कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा तत्पर झाली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व सहकारी कोविड रुग्णालयांशी समन्वय साधून रुग्णांच्या उपचारासाठी जातीने लक्ष घालत आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून विविध प्रकारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची सेवा करून सर्वोतपरी मदत सुरूच राहिली आणि आजपर्यंतही हा मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील ६० हजार कुटुंबांना साखर, मैदा, तूप, गूळ, चणाडाळ व रवा या धान्याचा एकत्रित पॅकेट देऊन गणपतीचा सण गोड केला जाणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!