कळंबोली दि.५ (दीपक घोसाळकर): पनवेल जवळील भंगार पाडा गावालगत विस हजार किलोग्रॅम वजनाच्या गॅस टँकर मधून व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये थेट गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटाने भंगार पाडा व आजूबाजूचा परिसर सोमवारी रात्री हादरला. सदरचे घटने बाबत कळंबोली अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दल प्रमुख सौरभ पाटील यांनी आपल्या जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर व आगामी होणाऱ्या टँकर व सिलेंडर स्फोटाची घटना टाळली. एका मोठ्या भरलेल्या टँकर मधून थेट कोणतीही प्रक्रिया न करता सिलेंडर मधून गॅस भरला जात होता. याची कोणतीही माहिती शासन ,पोलीस प्रशासन यांना कोणालाच नसल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बिनभोपट बेकायदा गॅस भरण्याचा गोरख धंदा हा लोकांच्या जीविताशी खेळ करणारा असून याबाबत या संबंधित बेकायदा धंद्याशी निगडित असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घटनास्थळी आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत अंदाजे २० वीस हजार किलोग्रॅम वजनाचे दोन मोठे गॅस ने भरलेले टँकर व शेकडो व्यवसायिक गॅस सिलेंडर एका कंटेनर मध्ये सापडून आले. घटनास्थळी बेकायदा काम करणारे कामगार हे तेथून पळून गेल्याने कोणीच हाती सापडले नाही. घटना घडली त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकही तेथे हजर झाले होते.
भंगार पाडा येथे असलेल्या वाहन तळामध्ये मोठ्या २० हजार किलोग्रॅम वजनाने भरलेल्या ३५ ते ४० फूट लांबीचे गॅसच्या दोन बुलेट मधून व्यवसायिक साठी वापरण्यात येणाऱ्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडर मध्ये बेकायदा गॅस भरून वितरित करण्याचा गोरख धंदा सुरू होता. मात्र सोमवारी रात्री दहा वाजता काही तांत्रिक चुकीमुळे गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. गॅसच्या स्फोटानंतर गॅसने पेट घेतल्याने जवळ उभ्या असलेल्या दोन प्रोपेन गॅस बुलेट ने ही पेट घेतला. एम. एच.४३ बिजी ५८४७ हा प्रोपेन गॅस बुलेट जळलेल्या अवस्थेत आढळून आला तर दुसऱ्या प्रोपेन गॅस बुलेटची नंबर प्लेट जळाल्याने त्याचा नंबर मिळू शकला नाही. त्यामध्ये किती गॅस भरला होता याची माहिती मिळू शकली नाही. मात्र सदरचे भरलेले गॅस बुलेटचा जर स्फोट झाला असता तर भंगारपाडा सहित तीन ते चार किलोमीटरच्या परिसर हा बेचिराख झाला असता. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारा गोरख धंदा भंगारपाडा येथील वाहनतळामध्ये सुरू होता. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या गोरख धंद्याची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला नव्हती हे एक अजब अन न पटणार सूत्र नागरिक व्यक्त करीत आहेत .आगीच्या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशामक दल प्रमुख सौरभ पाटील यांनी आपल्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. त्या अगोदर उलवे अग्निशामक दलातील जवानांनीही तेथे धाव घेऊन आग नियंत्रित आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या बेकायदा गॅस भरण्यात येणाऱ्या घटनेबाबत अग्निशामक दल प्रमुख सौरभ पाटील यांनी सांगितले की सदरचे प्रोपेन गॅस बुलेट हे किती भरलेले आहेत याची कल्पना आम्हाला नाही .मात्र जेथून ज्या कंपनीतून हे निघाले ते कोणाकडे गेले, कोणी दिले हे शोधून काढणे पोलिसांचे काम आहे. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडर भरत असताना त्यामध्ये मरकॅप्टन नावाचे केमिकल भरले जाते त्यामुळे जर गॅसचा लिकेज झाला तर त्याचा वास येतो व गॅस सिलेंडरची गळती ही ओळखू शकली जाते. मात्र यामध्ये मरकॅप्टन नावाचे केमिकल न भरता कोणतेही प्रोसेस न करता बेकायदा व्यवसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरण्याचे काळे कृत्य हे कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे हे शोधणे गरजेचे आहे. आज पनवेल परिसरामध्ये हातगाड्यांवर चायनीज वर व ज्या ज्या ठिकाणी बेकायदा सिलेंडर वापरले जात आहेत त्याची तपासणी करून या मानवी बॉम्बची शोध मोहीम राबवणे महसूल व पोलीस प्रशासनाचे आता काम आहे . घटना घडली त्यावेळेसही एका टेम्पो मधून भरलेले बेकायदा सिलेंडर एक इसम घेऊन जात होता. मात्र त्याला कळंबोली अग्निशामक दल प्रमुख सौरभ पाटील यांनी हटकले असता त्याने तिथेच टाकून पळून गेला. घटनास्थळी काम करणाऱ्या कामगार ही एका गॅस सिलेंडर वरती जेवण शिजवत होते व ते एका कंटेनरमध्ये राहून हे बेकायदा काम करत होते. तसेच या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाला त्या ठिकाणी एक मोबाईल,एचपी व भारत गॅसचे लावण्यात येणारे स्टिकर्सही, प्रोफेन गॅस बुलेट मधून व्यवसायिक सिलेंडर मध्ये भरण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप व काही साहित्यही घटनास्थळी सापडून आले.एका कंटेनर व टेम्पो मध्ये असे मिळून शेकडो व्यवसायिक सिलेंडर आढळून आले आहेत. त्यामुळे हे बेकायदा गोरख धंदा करणारी साखळी कुठपर्यंत आहे याचा आता शोध घेणे गरजेचे असून हे सिलेंडर कुठे कुठे वितरित होत होते याची माहिती घेणे आता जरुरीचे आहे. याबाबतचा तपास हा पनवेल शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे करीत असून लवकरात लवकर सदरचा गोरख धंदा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी भ्रमणध्वनीवर सांगितले.

💥पोटे मसाले तर्फे दिवाळीच्या शुभेच्छा
🛑Happy Diwali – Ramsheth Thakur
🪔’दिवाळी पहाट’ २०२४
🔉वडाळे तलाव, पनवेल.
🎼आनंद गंधर्व पं.आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांचे सुमधुर गायन
🛑’सरकार हे जनतेचे सेवक असले पाहिजे’- महेंद्र घरत
🪔’दीपसंध्या’ २०२४
🔉गावदेवी मैदान, खारघर
🎼सुप्रसिद्ध गायिका मैथली ठाकूर यांचे सुश्राव्य गायन
🪔”इंद्रधनु” मानव-पर्यावरण संवाद साधणारा दिवाळी अंक

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!