पनवेल दि.१९: नुकतीच सोमवार दि.१८ जुलै २०२२ रोजी लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर येथे झालेल्या रायगड जिल्हा पारंपारीक लंगडी असोसिएशनची कार्यकारी मंडळाची सभा पार पडली. सदर बैठकीमध्ये रायगड जिल्हा पारंपारीक लंगडी असोसिएशन च्या अध्यक्ष पदी महेश पाटील तर सचिव पदी हर्षद पाटील यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे खजिनदार म्हणून प्रतिज्ञा भोईर, उपाध्यक्ष म्हणून संदीप म्हात्रे व मंदार मुंबईकर, कार्याध्यक्ष पदी सुरेशभाऊ रांजवण, सह सचिव पदी सुरज पाटील, व सदस्य म्हणून शैलेश जाधव, अतुल फडके, सुधीर पाटील, जीवन पाटील, दर्शना भोपी, विलास पाटील यांची निवड झाली.
पारंपरीक लंगडी खेळाचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने अनेक नवीन सदस्य प्रयत्न करत आहेत. तर सदर सभे दरम्यान नव निर्वाचित अध्यक्ष महेश पाटील यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. तसेच उपाध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी आपल्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक २४ जुलै २०२२ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे येथे घेत असल्याचे जाहीर केले.
दिनांक २४ जुलै २०२२ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे येथे १२ वर्षाखालील मुले / मुली व १६ वर्षांखालील मुले / मुली या गटाची लंगडी स्पर्धा होणार आहे आणि प्रथमच हि स्पर्धा मॅट वर होणार असल्याचे जाहीर केले आहे.