पुणे दि.८: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रूग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती.
जंगल, नद्या, डोंगररांगा आणि ग्रामसमुदाय यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत त्यांनी अनेक संशोधन लेख, पुस्तके आणि अभ्यास अहवाल सादर केले.
डॉ. गाडगीळ यांनी देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये अध्यापन व संशोधन केले. भारतीय विज्ञान अकादमीसह विविध शैक्षणिक संस्थांशी ते दीर्घकाळ जोडलेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक घडले.
पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले.
- पद्मश्री पुरस्कार (1981)
- पद्मभूषण पुरस्कार (2006)
- शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1986)
- टाइलर पुरस्कार (2015)
- संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार (2024)
![]()
