पनवेल दि.०४ : पनवेल येथील डॉ. जान्हवी अजिंक्य पाटील यांची नियुक्ती भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी झाली. विध्यार्थी दशेपासून लोकाभिमुख व सामाजिक कार्याची आवड असलेल्या डॉ. जान्हवी पाटील यांना भाजपाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी कॅबीनेट मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस व भाजपा युवा मोर्चा प्रभारी संग्राम पाटील, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, आ. प्रशांत ठाकूर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा डॉ. प्रफुल्ल पाटील, भाजपा नगर सेविका डॉ. विद्या पाटील, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
लाइफ लाईन हॉस्पिटल, पनवेल येथे सल्लागार संचालक असलेल्या डॉ. जान्हवी पाटील शासकीय महाविद्यालय नागपूर येथून MBBS पदवी प्राप्त आहेत. त्यानंतर मुंबईच्या नामांकित BITS Pilani या संस्थेतून त्यांनी MBA चे पद्वुत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मेडिकल प्रक्टिस आणि कायदा या विषयात त्यांचे शिक्षण व अभ्यास चालू आहे. परभणीच्या सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज व पद्वूत्तर संस्थेच्या तसेच बी.एस.सी. नर्सिंग कॉलेज च्या विश्वस्थ आहेत. डॉ जान्हवी पाटील या डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल च्या संचालिकाही आहेत. शालेय जीवनापासूनच बहुआयामी नेतृत्व म्हणून त्यांची वाटचाल चालू होती. शिक्षण, आरोग्य शिक्षण, आरोग्य सेवा,
हॉस्पिटलिटी सेक्टर व रोगनिदान शिबिरे व आरोग्य जनजागृती कार्यक्रम यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्या मागील ५ वर्षा पासून करत आहेत. मराठवाडा, विदर्भ, कोंकण व मुंबई या विभागात त्यांचे वास्तव्य व सामाजिक व आरोग्यविषयक लोकोपयोगी उपक्रम सरस्वती धन्वंतरी मेडिकल, एजुकेशनल, सोशल व कल्चरल फौंडेशन च्या माध्यमातून चालतात.
नुकतेच भाजपाने विविध आघाड्यांवर उच्चशिक्षित व नेतृत्व गुण असलेल्या युवक व युवतींना पक्षाच्या व्यासपीठावर संधी देऊन जवळ केले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोंकण व मुंबई या चार विभागासाठी युवा संगठन, आणि आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवा क्षेत्राद्वारे समाजाभिमुख रचनात्मक कार्यक्रम देण्याचा डॉ. जान्हवी पाटील यांचा मानस आहे.