शॉपींग मॉलमध्ये दर शुक्रवारी सायंकाळी ४.०० नंतर शनिवार आणि रविवारी येणार्‍या प्रत्येकाची अँटीजन कोविड चाचणी बंधनकारक
पनवेल, दि. २५: पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी या क्षेत्रातील कोरोना नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः शॉपींग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनी नव्या नियमानुसार काम केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच ते पूर्ण बंद करण्याचा इशाराही, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नव्या आदेशाद्वारे दिला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेषतः शॉपींग मॉल्स आणि डी मार्ट, स्टार बाजार, रिलायन्स फ्रेश यांसारख्या डिपार्टमेंट स्टोअरसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. शॉपींग मॉल्स आणि डिपार्टमेंट स्टोअरमध्ये मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान तपासूनच प्रवेश दिला जावा, ताप किंवा तापसदृश्य लक्षणे आढळल्यास प्रवेश देऊ नये, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरेसे मनुष्यबळ व्यवस्थापनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच डिपार्टमेंट स्टोअरर्समध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात यावा. याबरोबरच शॉपींग मॉलमध्ये दर शुक्रवारी सायंकाळी ४.०० नंतर शनिवार आणि रविवारी येणार्‍या प्रत्येकाची अँटीजन कोविड चाचणी बंधनकारक राहील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वर पहिल्या दोन वेळा प्रत्येकी २५ हजाराचा दंड आकारला जाईल तर तिसर्‍यावेळी नियम उल्लंघन करणाऱ्या शॉपींग मॉल/ डिपार्टमंट स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
सेंट्रल पार्क वगळता उद्याने आणि मैदाने सकाळी ५.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत खुली राहतील, पण यामध्ये ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहित्य पुर्ण बंद राहील. तसेच मास्क, सामाजिक अंतराचे काटोकोर पालन करणे बंधनकारक राहील.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!