अलिबाग, दि.20 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 18 हजार 725 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 535 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-212, पनवेल ग्रामीण-55, उरण-16, खालापूर-24, कर्जत-22, पेण-43, अलिबाग-41, माणगाव-38, तळा-2, रोहा-31, सुधागाड-10, श्रीवर्धन-3, म्हसळा-7, महाड-31 असे एकूण 535 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 11 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-3, उरण-2, पेण-1, अलिबाग-1, रोहा-2, सुधागड-1, महाड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 425, पनवेल ग्रामीण-420, उरण-174, खालापूर-207, कर्जत-76, पेण-249, अलिबाग-277, मुरुड-29, माणगाव-150, तळा-14, रोहा-175, सुधागड-41, श्रीवर्धन-30, म्हसळा-14, महाड-181, पोलादपूर-18 अशी एकूण 3 हजार 480 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-8 हजार 106, पनवेल ग्रामीण-2 हजार 471, उरण-980, खालापूर-1 हजार 224, कर्जत-611, पेण-1 हजार 528, अलिबाग-1 हजार 274, मुरुड-158, माणगाव-433, तळा-24, रोहा-817, सुधागड-71, श्रीवर्धन-167, म्हसळा-200, महाड-573, पोलादपूर-88 अशी एकूण 18 हजार 725 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-131, पनवेल ग्रामीण-42, उरण-23, खालापूर-31, कर्जत-18, पेण-40, अलिबाग-28, मुरुड-3, माणगाव-16, रोहा-17, श्रीवर्धनन-9, म्हसळा-2, महाड-30, पोलादपूर-2 असे एकूण 392 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-250, पनवेल ग्रामीण-60, उरण-57, खालापूर-54, कर्जत-35, पेण-52, अलिबाग-46, मुरुड-17, माणगाव-12, तळा-2, रोहा-28, सुधागाड-3, श्रीवर्धन-12, म्हसळा-8, महाड-35, पोलादपूर-11 असे एकूण 682 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 80 हजार 534 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 161 आहे.