पनवेल दि.१४: पनवेल महापालिका हद्दीत आज २० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पनवेल ग्रामीणमध्ये आज ७ नवीन कोरोनाबधित रूग्णांची नोंद झाली आहे.
महापालिका हद्दीत आढळलेल्या रूग्णांमध्ये खारघर ८, कामोठ्यात ८, कळंबोली ३ तर नवीन पनवेलमधील एका रूग्णाचा समावेश आहे.
पनवेल ग्रामीण मधील आज आढळलेल्या रूग्णांमध्ये विचुंबे येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा तर कोप्रोली आणि उलवे येथील प्रत्येकी १-१ रूग्णाचा समावेश आहे.

महापालिका हद्दीत २० नवे रूग्ण
खारघर: ८

खारघर. सेक्टर-१५, घरकुल येथील ४७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

खारघर, सेक्टर-२१, ज्ञानसाधना सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख बेस्ट डेपो, धारावी, मुंबई येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

खारघर, सेक्टर-१०. यशवंत गायकर चाळ येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे टेम्पो ड्रायव्हर असून भाजीची ने-आण करण्याचे काम करीत आहे. जवळचा नातेवाईक याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला असून त्याच्यापासूनच याला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

खारघर, सेक्टर-३५. मयांक रेसीडन्सी येथील २३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती भाजीपाला विक्रेता असून तो नेहमी APMC मार्केट, वाशी येथे भाजी खरेदीकामी झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. जात होता. सदर ठिकाणीच त्यांना संसर्ग

खारघर, सेक्टर-१२, अशोका रेसिडन्सी येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती HPCL कंपनी, माहूल येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

खारघर, सेक्टर-१६, वास्तुविहार सोसायटी येथील ४५ वर्षीय महिला कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती बेस्ट डेपो, धारावी, मुंबई येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

खारघर, सेक्टर-१५, घरकुल कुंजविहार येथील ५५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती शिवाजी नगर गोवंडी पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे: ८
कामोठे, सेक्टर-१९. विस्ता कॉर्नर येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-१८. तिरूपती एन्क्लेव्ह येथील ३८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती पोलिस क्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-५, मारूतीधाम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा मानखुर्द येथे कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-३५. साईसागर सोसायटी येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती टाटा हॉस्पीटल, मुंबई येथे मुकादम म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-६ओ, विजयदिप अपार्टमेंट येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती दादर बेस्ट डेपो येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-१०. अष्टविनाय कृपा सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर दिनांक ३०/०४/२०२० ते १२/०५/२०२० दरम्यान जी.टी.हॉस्पीटल. मुंबई येथे उपचार घेऊन पुर्णपणे बरी होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाकडून पनवेल महानगरपालिकेला आजरोजी प्राप्त झाली आहे.

कळंबोली: ३
कळंबोली, सेक्टर-१ई. सत्यसंस्कार सोसायटी येथील ४२ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला नायर हॉस्पीटल, मुंबई येथे नर्स म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कळंबोली, सेक्टर-११, न्यू संकूल सोसायटी येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती पोटाच्या विकाराच्या उपचारासंबंधी अनेकवेळा बेलापूर येथील हॉस्पीटलमध्ये जात होती. सदर हॉस्पीटल मध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कळंबोली, सेक्टर-११, गुरूकुटीर कॉम्प्लेक्स येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बेस्ट डेपो मुंबई येथे कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

नविन पनवेल: १
नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप यथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती नविन पनवेल येथे फळ विक्रीचा व्यवसाय करत आहे. फळ खरेदी करण्याच्या निमित्ताने अनेकवेळा ही व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे गेलेली आहे. त्याठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पनवेल ग्रामीण मधील रूग्ण -७
विचुंबे: ५

ग्रीन व्हॅली हौ.सोसा., येथील ३९ वर्षीय, ३५ वर्षीय, १२ वर्षीय, १० वर्षीय, व २३ वर्षीय असे पाच व्यक्ती कोविड १९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हे याआधी कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेले होते. सदर पाच व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कोप्रोली: १
फॉरच्युन गार्डन, हौ.सोसा., येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती संत मुक्ताबाई रूग्णालय मुंबई या रूग्णालयातील कर्मचारी आहेत. सदर व्यक्ती कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

उलवे: १
निलसिध्दी जोया, प्लॉट १८३, सेक्टर २०,येथील ५१ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती कुलाबा, मुंबई येथे पोलीस विभागात कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!