ठाणे दि.६: ‘द केरळ स्टेरी’ पाहण्यासाठी एका रिक्षा चालकाने मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी रिक्षा चालकाची महिलांसाठी खास ऑफर जो पर्यंत चित्रपट चित्रपटगृहात आहे. तो पर्यंत कल्याण डोंबिवली परिसरातूल महिलांना मोफत रिक्षासेवा देणार असल्याचे डोंबिवली मधील रिक्षा चालकाचा निर्णय आहे . गणेश म्हात्रे असे या रिक्षा चालकाचे नाव असून हा रिक्षा चालक कल्याणच्या खोणी परिसरामध्ये राहतो.
या रिक्षाचालकाने ‘द केरळ स्टोरी‘ हा चित्रपटा पाहायला जाणाऱ्या लोकांसाठी आपण मोफत सेवा पुरवणार असल्याचे सांगितले आहे. आपला मोबाईल नंबर ही त्याने रिक्षावर नोंद केला आहे. या रिक्षाचालकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.