पनवेल दि.२९: भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्यावतीने रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सायंकाळी ०५ वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार व ‘प्रतिपक्ष’ या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भाऊ तोरसेकर हे ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे. भाऊ तोरसेकर यांनी १९६९ मध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. भाऊ तोरसेकर यांनी साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारीता केली. १९८५ ते १९८९ या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विवेक, चित्रलेखा यांसारख्या साप्ताहिकमध्ये त्यांनी काम केले. प्रतिपक्ष नावाच यूट्यूब चनल आह. माऊच्या जागता पहारा या ब्लॉगवर ७५ लाखाहून अधिक वाचक आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!