पनवेल दि.13: सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेजमध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठ स्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक चार कांस्य पदक पटकाविले. 
     या स्पर्धेत मुलांनी इपी प्रकारात कांस्य पदक व सेबर प्रकारात कांस्य पदक तर मुलींनी सुद्धा इपी प्रकारात कांस्य पदक व सेबर प्रकारात कांस्य पदक मिळवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच या स्पर्धेत विदांत नाईक, करण खेडकर, अभिषेक चव्हाण, आदित्य पांडा, श्रेया जाधव , कशिश पाटील, हर्षिता चौहान आणि नम्रता वाहुलकर यांनी सांघिक विजेतेपद मिळवले. तसेच
सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक मिळवून विजेतेपद  प्राप्त केले.
          त्याचबरोबर स्पर्धेत  रितिका कारंडे(७२ किलो खालील) सुवर्ण पदक, समीक्षा बोरगे (६२ किलो खालील) रजत पदक,  आदित्य पांडा(९७ किलो खालील) कांस्य पदक, नवीन डोंगरे (६५ किलो खालील) कांस्य पदक, समृद्धी जाधव(५५ किलो खालील) कांस्य पदक , अस्मिता मोरे (६५ किलो खालील) कांस्य पदक, दिशा घनवट (७६ किलो खालील) कांस्य पदक आणि दीपश्री म्हात्रे (७६ किलो खालील) कांस्य पदक या प्रमाणे पदक प्राप्त करून सांघिक द्वितीय विजेते पद मिळवले.
       या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील, कुस्ती प्रशिक्षक रूपेश पावशे यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील यांनी विद्यार्ध्यांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!