पनवेल दि.14: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना महासाथीचा मुकाबला करताना ‘संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा, पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमातील सेवासप्ताह अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने खारघरमधील श्री. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड स्कुल येथे आणि भारतीय जनता पार्टी व आमदार महेश बालदी जनसंपर्क मोहोपाडा कार्यालय येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीर होणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी अमर ठाकूर (८७६७१७१०१०), दिनेश खानावकर (९८९२४४५२५२), शेखर तांडेल (९८३३५४५७७७) किंवा चिन्मय समेळ (८७६७१४९२०३) यांच्याशी संपर्क साधावा. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133