पनवेल,दि.6 : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने पनवेलमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्माणदिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पुतळापरिसराची नुकतीच स्वच्छता करण्यात आली होती. तसेच मंडप घालून सुशोभिकरण करण्यात आले आहे. याबरोबरच पनवेल, खारघर, कामोठे याठिकाणहून दादरला,चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी चहा ,पाणी व बिस्किटे यांची सोय महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे , उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, सहायक आयुक्त स्वरूप खारगे,जिल्हा अध्यक्ष उत्तर रायगड अविनाश कोळी, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, माजी नगरसेवक नितिन पाटील, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, प्रभारी अधिक्षक रोशन माळी, भांडार विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे, पालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी ,कर्मचारी, माजी नगरसेवक, विविध संघटनाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!