उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील पागोटे येथील रहिवाशी शिवभक्त कु.आराध्य विवेक पाटील हा RK फाऊंडेशन जे एन पी टीच्या स्कुलमध्ये इयत्ता इयता 2 री मध्ये शिकत असून आराध्यला लहानपणापासून त्याचे वडील विवेक चंद्रकांत पाटील हे त्याला छत्रपती शिवरायांच्या गोष्टी सांगत असत व मराठ्या मावळ्यांचे शौर्य पराक्रम त्यांच्या गोष्टी त्याला सांगत होते आणि ते त्याच्या मनात रुजत गेलं व वयाच्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वराज्याची राजधानी रायगड सर केला आणि तिथूनच त्यांला प्रेरणा मिळाली व गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली आत्ता पर्यत ७ वर्षाच्या या वयात त्यांनी १४ किल्ले सर केले आहेत आणि या पुढे ही त्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहास व मराठ्या मावळांचा इतिहास व गड कोट किल्ल्यांची माहिती मिळावी या साठी सतत तो उत्साही असतो.आत्तापर्यंत आराध्यने रायगड, कुलाबा,शिवनेरी,प्रतापगड, लोहगड, सिंहगड, सुधागड, द्रोणागिरी, अवचितगड, पद्दुमदुर्ग, भोरपगड, मर्दनगड, जेजुरीगड, कर्नाळा हे किल्ले सर केले आहेत. मोबाईल गेम्स व टीव्हीच्या जगात आराध्य मात्र छत्रपती शिवरायांच्या गड कोट किल्ल्यांचा इतिहास जानण्याचा प्रयत्न करत आहे. आराध्यचे हे शौर्य पाहुन, त्याची शिवभक्ती पाहून त्याच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!