पनवेल दि.११: मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्यांची नेमणूक केली जाते. त्या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नऊ जणांची सिनेट सदस्यपदी नेमणूक केली आहे. त्यामध्ये पनवेलचे मयुरेश नेतकर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मयुरेश नेतकर यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
मुंबई विद्यापीठ (पूर्वी बॉम्बे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे) हे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. या अंतर्गत ८०० महाविद्यालये संलग्न आहेत. सदस्यत्त्वाचा पाच वर्षांचा कालावधी असलेल्या सिनेट सदस्य म्हणून विद्यापीठ अंतर्गत निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो. मयुरेश नेतकर हे गेल्या १५ वर्षांपासुन विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतात, पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन समस्या सोडविण्यासाठी धडपडत असतात. महाविद्यालयीन समस्या सोडवताना प्रसंगी त्यांनी अनेक आंदोलने उभारली निदर्शने केली आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन दिला. विद्यार्थी व युवकांना संघटीत करत असताना शैक्षणिक समस्या अधोरेखित करण्याचे काम त्यांनी केले आहे. या महत्वपूर्ण नियुक्ती झाल्याबद्दल मयुरेश नेतकर यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!