५०० हून अधिक महिलांनी घेतला सहभाग
स्वीप अंतर्गत महिला मिनी मॅरेथॉन कार्यक्रमामध्ये मतदान जनजागृती
पनवेल,दि.१८: रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व पनवेल महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये महिला सुरक्षिता व मतदान जनजागृती अभियान हे विषय अनुसरून महिला मिनी मॅराथॉन स्पर्धा रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात आयोजित करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ही संस्था गेली पस्तीस वर्षे डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर व तालुक्यातील विविध भागात शासकीय, निमशासकीय तसेच विविध सामाजिक संस्था च्या सहकार्याने अनेक लोकोपयोगी प्रकल्प करत असतात त्या अनुषंगाने पनवेल मध्ये पनवेल महानगर पालिकेच्या सहकार्याने एक धाव महिला सुरक्षितेसाठी व मतदान जनजागृती साठी हे ब्रीद वाक्य ठेऊन केवळ महिलांसाठी मिनी मॅराथॉन आयोजित करण्यात आली. या मध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर व सेलिब्रेटीनं साठी 1 किलोमीटर असे अंतर ठेवण्यात आले. स्पर्धेपूर्वी प्रथम सर्व स्पर्धक महिलांसाठी झुंबा व्यायाम प्रकार आयोजित केला होता व स्पर्धे नंतर महिलांना स्वसंरक्षण कसे करावे या बाबत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तायकॉन्डो खेळाडूंनी प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले. पनवेल महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त रुपाली माने, समाजविकास अधिकारी स्वप्नाली चौधरी, नगर रचनाकार अनिता नेरकर यांचे सोबतीने दोन वासुदेवांनी मतदानाविषयी उपस्थितीताना जनजागृती केली. या स्पर्धेत अनेक महिलांनी उत्साहाने सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी केली. या प्रसंगी रोटरी प्रांत 3131 चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार,नियोजित प्रांतपाल (2027-28) नितीन ढमाले हे सह कुटुंब, मुख्य प्रयोजक ओरियन मॉल चे मंगेश परुळेकर यांची कन्या मनांकी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर मिनी मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, प्रोजेक्ट चेअरमन ऋषी बुवा, को- चेअरमन सिकंदर पाटील यांचे सह सर्व रोटरी सदस्य व त्यांच्या कुटूंबीयांनी अथक मेहनत घेतली.