उरण दि.७ (विठ्ठल ममताबादे) चिरनेर बापुजी देव मंदिरा पासुन काही अंतरावर असलेल्या खदानी मध्ये सोमवारी मुकी जनावर तहान भागविन्यासाठी पाणी पिण्यासाठी जात असतात. पाणी पिऊन सर्व जनावर बाहेर निघाली परंतु एक गाय चिखलात अडकली. तीला बाहेर निघता येत नव्हते. ही बातमी केअर ऑफ नेचर संस्थेचे उपाध्यक्ष महेश पाटील यांना समजताच महेश पाटील यांनी श्री.महागणपती अकॅडेमी चिरनेरचे विद्यार्थी अतिष नारंगीकर, जयहिंद ठाकुर,प्रेमल पाटील, अदित्य डुंगीकर यांना घेऊन त्या ठिकाणी गेले. सर्व पाहणी करुन आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या गाईला बाहेर कठाळे. ही बातमी गावात समजताच केअर ऑफ नेचर आणि श्री. महागणपती अकॅडेमीच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि या पुढेही असेच चांगली काम तुमच्या हातुन व्हावे असे शुभेच्छा दिल्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!